Marathi News

Pravin Darekar on Maharashtra CM Post: शिवसेनेला मुख्यमंत्रिपदाचा शब्द दिलाच नव्हता; भाजपच्या ‘या’ नेत्याचा दावा – bjp didn’t give any commitment to shivsena, says pravin darekar


मुंबई: बिहार विधानसभा निवडणुकीत संयुक्त जनता दलापेक्षा जास्त जागा जिंकल्यामुळं भाजप नितीश कुमार यांना पुन्हा मुख्यमंत्रिपदाची संधी देणार का, याबाबत तर्कवितर्क लढवले जात होते. भाजपच्या काही नेत्यांनी केलेल्या उलटसुलट विधानांमुळं यात भर पडली होती. मात्र, भाजपनं नितीश यांनाच मुख्यमंत्रिपदी बसवलं आहे. बिहारमधील घडामोडींवरून आता महाराष्ट्रात टीका-टिप्पणी सुरू झाली आहे. (Pravin Darkear on Maharashtra Politics)

विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी बिहारच्या निमित्तानं महाराष्ट्रात वर्षभरापूर्वी घडलेल्या नाट्यमय घडामोडींना उजाळा देत शिवसेनेवर तोफ डागली आहे. ‘महाराष्ट्रात भाजपनं शिवसेनेला मुख्यमंत्रिपदाचा शब्द दिलाच नव्हता,’ असा दावा दरेकर यांनी केला आहे.

विधान परिषद: राज्यपालांकडे नावे पाठवताना ठाकरे सरकारची मोठी खेळी

बिहारमध्ये नितीश कुमार पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेत आहेत. नितीश कुमार यांना मुख्यमंत्रिपद देऊन भाजपनं शब्द पाळला आहे, असं भाजपचे नेते सांगत आहेत. ‘बिहारमध्ये भाजपनं आधीच जाहीर केल्यानुसार नितीश मुख्यमंत्री होत आहेत. दिलेला शब्द आम्ही पाळला आहे. महाराष्ट्रात असा कुठलाही शब्द आम्ही दिला नव्हता,’ असं दरेकर यांनी ‘टीव्ही ९’ या वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितलं. ‘शिवसेनेनं मुख्यमंत्रिपदाची मागणी केली होती हे खरं आहे. पण, भाजपनं तसा कोणताी शब्द दिला नव्हता, असं ते म्हणाले.

वाचा: सीकेपी बँकेच्या छोट्या ठेवीदारांना मोठा दिलासा

बिहारमध्ये भाजपच्या दोन आमदारांना उपमुख्यमंत्री म्हणून संधी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याबाबत विचारलं असता, ‘बिहार हे मोठं राज्य असल्यामुळं पक्षानं तसा निर्णय घेतला आहे. त्यामागे दुसरं कुठलंही कारण नाही. महिलांचे प्रश्न समजून घेता यावेत म्हणून महिलेला उपमुख्यमंत्रीपद देण्याचं ठरलं आहे,’ असं दरेकर यांनी स्पष्ट केलं.

वाचा: ‘महाराष्ट्राच्या मंत्रालयाचा नवीन पत्ता ‘कृष्णकुंज”Source link

You may also like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: