Marathi News

Pravin Darekar: Pravin Darekar: ठाकरे सरकारचा वीज बिल घोटाळा?; भाजपने केला ‘हा’ गंभीर आरोप – pravin darekar targets nitin raut over high electricity bills


मुंबई: राज्य सरकार जोपर्यंत वाढीव वीज बिलांबाबत निर्णय घेणार नाही, तोपर्यंत वीज ग्राहक मेळावे होऊ देणार नाही, असा इशारा विधानपरिषदेतील विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी दिला आहे. सरकार करोना काळातील वीज बिलांबाबत गेल्या ४ महिन्यांपासून टोलवाटोलवी करत असून ही टोलवाटोलवी थांबवून ग्राहकांना तातडीने दिलासा देण्याची गरज आहे, असेही दरेकर यांनी स्पष्ट केले. ( Pravin Darekar Targets Nitin Raut Over High Electricity Bills )

वाचा: सर्वसामान्यांना शॉक! वाढीव वीज बिल भरावेच लागणार

महाविकास आघाडी सरकारने वीज बिल सवलतीबाबत यू-टर्न घेतला आहे. करोना काळात वीज बिल माफीची लोकप्रिय घोषणा करण्यात आली परंतु, आता वाढीव वीज बिलातून ग्राहकांना दिलासा मिळणार नाही, मीटर रिडिंगप्रमाणे आलेली बिलं ग्राहकांनी भरलीच पाहिजेत, असे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी सांगितले आहे, असे सांगत दरेकर यांनी सरकारवर जोरदार निशाणा साधला. वीज बिलं चुकीची आणि वाढीव दिलेली आहेत. त्यामुळे ग्राहकांवर जो अन्याय झाला आहे तो दूर व्हायलाच हवा. त्यासाठी सत्तारूढ व विरोधी पक्षाच्या सदस्यांची समिती गठीत करण्यात यावी, म्हणजे “दूध का दूध और पानी का पानी होगा”, असे दरेकर म्हणाले. करोनाच्या नावाखाली तुम्ही जनतेला लुटले असून हा सरकार पुरस्कृत मोठा घोटाळा आहे, असा गंभीर आरोपही दरेकर यांनी केला.

वाचा: वीजबिलावर शब्द फिरवला; माजी मंत्र्याने ठाकरे सरकारला दिली ‘ही’ उपमा

भातखळकर, खोत यांचेही टीकास्त्र

भाजपचे आमदार अतुल भातखळकर यानीही वीज बिलांबाबत घुमजाव करणाऱ्या ऊर्जामंत्र्यांवर निशाणा साधला आहे. ‘वीज बिल प्रकरणी लोकांच्या तोंडाला पाने पुसणाऱ्या बेशरम ठाकरे सरकारला हजार व्होल्टेजचा झटका देण्याची गरज आहे’, असे ट्वीट भातखळकर यांनी केले आहे. जनतेची फसवणूक करणारे खोटारडे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याविरोधात आपण हक्कभंग ठराव आणणार असेही त्यांनी सांगितले आहे. दुसरीकडे रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष व माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनीही राऊत यांच्यावर तोफ डागली आहे. करोना संकटामुळे शेतकरी आणि कामगारांचे कंबरडे मोडले असताना १०० टक्के वीज बिलमाफी देऊन खरंतर या वर्गाला आधार देण्याची गरज आहे मात्र, गेंड्याचं कातडं पांघरलेल्या महाविकास सरकारला जाग यायला तयार नाही, अशा शब्दांत खोत यांनी प्रहार केला आहे.

वाचा: मुंबईत छठपूजा यंदा कुठे होणार?; पालिकेने घेतला ‘हा’ खूप मोठा निर्णयSource link

You may also like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: