Pune: पुणे: अॅड. उमेश मोरेंचे अपहरण करून हत्या केल्याप्रकरणी वकिलाला अटक – pune lawyer kidnapping and murder case accused lawyer arrested by police


म. टा. प्रतिनिधी, पुणे: शिवाजीनगर जिल्हा न्यायालयाजवळून अॅड. उमेश मोरे यांचे अपहरण करून त्यांचा खून केल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी आणखी एका वकिलाला अटक केली आहे. त्याला बुधवारी कोर्टात हजर करण्यात आले असता, ३१ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

या प्रकरणी पुणे पोलिसांनी घनश्याम दराडे या वकिलाला अटक केली आहे. या प्रकरणी यापूर्वी तिघांना अटक करण्यात आली असून, त्यात एका वकिलाचा समावेश आहे. त्यांच्या पोलीस कोठडीची मुदत उद्या २९ ऑक्टोबर रोजी संपत आहे. कपिल विलास फलके, दीपक शिवाजी वांडकेर, अॅड. रोहित शेंडे यांना यापूर्वी अटक करण्यात आली. अटक आरोपी दराडेने अॅड. मोरे कोठे आहे, याची माहिती आरोपी फलके आणि शेंडे यांना मोबाइलवरून दिल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.

‘अशी’ झाली हत्या

पुण्यातील शिवाजीनगर कोर्टाच्या परिसरातून १ ऑक्टोबरला अॅड. उमेश मोरे यांचे अपहरण करण्यात आले होते. सकाळी काही कामानिमित्त मोरे हे घराबाहेर पडले होते. संध्याकाळ झाली तरी ते घरी परतले नाहीत. त्यांचा शोध घेतला पण ते सापडले नाहीत. अखेर कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्यांचा शोध घेण्यासाठी पथकांची नेमणूक केली होती. मोरे यांचा शोध घेत असताना, पोलिसांनी त्यांच्या संपर्कातील प्रत्येकाकडे चौकशी केली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजही तपासले. मात्र, त्यांचा काहीच ठावठिकाणा लागू शकला नव्हता. मोरे यांचा शोध घेत असतानाच, ताम्हिणी घाट परिसरात एक मृतदेह आढळून आल्याची माहिती मिळाली होती. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. तो मृतदेह मोरे यांचा असल्याचं स्पष्ट झाले होते. यानंतर पोलिसांनी या प्रकरणात एका वकिलासह तिघांना अटक केली होती.

पुणे: वाइन शॉप फोडले; पावणेदोन लाखांची चोरी

विहिरीत आढळला तरुणाचा मृतदेह; आत्महत्या की घातपात?

पुणे: बहिणीने प्रेमविवाह केला; चिडलेल्या भावानं तलवारी नाचवल्या, वाहनांची तोडफोडSource link

Comments are closed.