Marathi News

Pune: पुणे: माजी नगरसेविकेच्या पतीची गळफास घेऊन आत्महत्या – pune former corporator nita rajput husband jayant rajput committed suicide


म. टा. प्रतिनिधी, पुणे: माजी नगरसेविका नीता परदेशी-रजपूत यांचे पती जयंत रजपूत (रा. खजिनाविहार) यांनी लॉ कॉलेज रस्त्यावरील ऑफिसमध्ये मध्यरात्री गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी डेक्कन पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जयंत यांच्या पत्नी नीता परदेशी या काँग्रेस पक्षाच्या स्थानिक नेत्या आणि माजी नगरसेविका आहेत. जयंत यांचे लॉ कॉलेज रस्त्यावरील कांचन गल्लीत ऑफिस आहे. त्यांची बारामतीत औषध कंपनी आहे. ते व्यवसायिक आहेत. बुधवारी मध्यरात्री त्यांनी ऑफिसमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांचा मुलगा ऑफिसमध्ये गेल्यानंतर त्यांना वडील जयंत यांनी गळफास घेतल्याचे दिसून आले. यानंतर त्यांनी पोलिसांना माहिती दिली. डेक्कन पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. आर्थिक अडचणीतून त्यांनी आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

लग्नात अडथळा आणत होता, संतप्त तरुणाने शेजाऱ्याची दुकाने जेसीबीने केली भुईसपाट

‘या’ शिवसेना खासदारांच्या जीवाला धोका; २ कोटींची दिली ‘सुपारी’

मुंबई: जेवणाची ऑर्डर घेतली नाही, हॉटेल मालकाला भोसकलेSource link

You may also like

%d bloggers like this: