Marathi News

Pune news: खबरदारी कधी घेणार? विना मास्क फिरणाऱ्या पुणेकरांकडून तब्बल ८ कोटींचा दंड वसूल – pune: over rs 8 crore fine collected for not wearing mask


म. टा. प्रतिनिधी, पुणेः घराबाहेर पडताना मास्क न घातल्याने तब्बल आठ कोटी ५४ लाख रुपयांचा दंड पुणेकर नागरिकांनी भरला आहे. गेल्या अडीच महिन्यातच पोलिसांनी हा दंड वसूल केला आहे. यासर्व प्रकारामुळे नागरिकांच्या मनात करोनाची भिती आहे की नाही? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

करोनाचा वाढता प्रादुर्भाव कमी करण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन राज्य सरकार आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या वतीने केले जात आहे. मात्र याकडे दुर्लक्ष करण्याचे धोरणच पुणेकरांनी स्विकारले आहे.

दोन सप्टेंबर ते १९ ऑक्टोबर या अडीच महिन्याच्या काळात पुणे पोलिसांनी मास्क न घालणाऱ्या एक लाख ७२ हजार ६३१ जणांकडून तब्बल आठ कोटी ५४ लाख १० हजार ५५० रूपयांचा दंड वसूल केला आहे.

राज्यात करोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढली; ‘ही’ धोक्याची घंटा तर नाही?

सक्रिय रुग्णसंख्या पुन्हा पाच हजारांपर्यंत

शहरातील रुग्णसंख्या वाढल्याने आता सक्रिय रुग्णसंख्येत भर पडत असल्याचे दिसून येत आहे. शहरात शनिवारी ४४३ जणांना संसर्ग झाला असून सक्रिय रुग्णसंख्या पुन्हा पाच हजारापर्यंत पोहोचू लागली आहे. त्यामुळे चिंतेत आणखी भर पडत आहे. जिल्ह्यात ही रुग्णसंख्या वाढत असून ९१४ रुग्ण आढळले आहेत.

‘महापुजेला विरोध करणारे वारकरी नसून संघाचे चमचे’

पुणे शहरात गेल्या काही दिवसांपासून रुग्णसंख्या वाढली आहे. त्यामुळे गंभीर रुग्ण, सक्रिय रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे. दुसरीकडे व्हेंटिलेटरवरील रुग्ण कमी-जास्त होत आहेत. मृतांचा आकडा मात्र दिवसाला दहाच्या आत आहे. शहरात ४८२१ एवढे सक्रिय रुग्ण आहेत.

प्रशासकराज संपुष्टात, ‘या’ तारखेला ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची शक्यताSource link

You may also like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: