Marathi News

raju shetti vs sadabhau khot: लुटारू, फालतू आणि बरंच काही!; शेट्टी-खोत वादाची ठिणगी कुणामुळे पडली? – tussle between raju shetti and sadabhau khot


कोल्हापूर: लुटारूंची संगत सोडली तर राजू शेट्टी यांना खांद्यावर घेऊ असे म्हणणाऱ्या आमदार सदाभाऊ खोत यांना माजी खासदार राजू शेट्टी यांनी दरवाजे बंद असल्याचे सांगितल्याने दोघात पुन्हा वादाची ठिणगी पडली आहे. ऊसाचा हंगाम सुरू होताच या दोघातील वादाचा हंगामही सुरू झाल्याच्या पार्श्वभूमीवर दोघांत आरोप-प्रत्यारोपाचे फटाके उडाले. ( Tussle between Raju Shetti and Sadabhau Khot )

वाचा: लांडग्याच्या वळचणीला जाणार नाही!; शेट्टींवर खोतांचा ‘हा’ गंभीर आरोप

गेल्या तीन चार वर्षांत शेट्टी आणि खोत यांच्यात सतत वादाचे खटके उडत असतात. दोघेही एकमेकांवर आरोप करत असतात. दोन दिवसांपूर्वी या आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी सुरू झाल्या आहेत. स्वाभिमानी संघटनेत येण्याची इच्छा व्यक्त केल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांना स्वाभिमानीत कधीही घेणार नाही, असे प्रत्युत्तर शेट्टी यांनी दिले आहे. मुळात मी असे म्हटलो नव्हतो असा खुलासा करतानाच मरेपर्यंत या संघटनेत येणार नसल्याचा टोला खोत यांनी मारला. दोघांत टोकाचे मतभेद झाल्याने ते पुन्हा एकत्र येण्याची चिन्हे नाहीत. या निमित्ताने दोघांतील वादातून त्यांनी जे टोले मारले, त्यामुळे ते दोघे पुन्हा एकदा चर्चेत आले.

वाचा: भाजपवर दबाव टाकण्याचा सदाभाऊंचा प्रयत्न फसला!

सदाभाऊ खोत हा फालतू नेता आहे. भाजपमध्ये आता त्यांना कुणी विचारत नाही. त्यामुळे स्वत:चे महत्त्व वाढवून घेण्यासाठी ते स्वाभिमानी संघटनेचा वापर करून घेत आहेत. त्यांची आणि आमची काम करण्याची पद्धत वेगळी आहे. त्यांचे हात बरबटलेले आहेत. चारित्र्य स्वच्छ नाही. अशा माणसाबरोबर काम करण्याची जराही इच्छा नाही. आम्ही संघटनेतून त्यांना हाकलून लावले आहे, त्यामुळे पुन्हा संघटनेत घेण्याचा प्रश्नच येत नाही.- राजू शेट्टी, अध्यक्ष, स्वाभिमानी संघटना

माझी स्वत:ची संघटना आहे. गावोगावी माझे कार्यकर्ते तयार केले आहेत. शेट्टी आणि माझ्यात मत आणि मनभिन्नता आहे. ते लुटारूंच्या टोळीत काम करतात. लुटारूंची संगत सोडली तर त्यांना खांद्यावर घेऊ असे मी म्हणालो होतो, याचा अर्थ मी त्यांच्याबरोबर काम करायला इच्छूक आहे असे नाही. त्यांची साथ कधीच सोडली आहे. आता मरेपर्यंत त्यांच्या सोबत जाणार नाही. राजकीय लाभापोटी संघटना इतरांच्या दावणीला बांधणाऱ्या शेट्टीनी नैतिकतेच्या गप्पा मारू नयेत. – सदाभाऊ खोत, अध्यक्ष, रयत क्रांती संघटना

वाचा: महाराष्ट्रातील ‘या’ गावाचं थेट युरोप कनेक्शन; शरद पवारही झाले थक्क!Source link

You may also like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: