Marathi News

Ram Kadam: पालघर साधू हत्याकांड आम्ही विसरलेलो नाही; भाजपचा सरकारला इशारा – bjp mla ram kadam strongly criticizes maha vikas aghadi government


मुंबई: पालघर साधू हत्याकांड आम्ही विसरलेलो नाही,’ असा इशारा देतानाच, ‘या हत्याकांडाचा तपास सीबीआयकडं देण्याची सुबुद्धी राज्यातील ठाकरे सरकारला यावी असं साकडं आम्ही सिद्धिविनायकाला घालणार आहोत,’ अशी संतप्त प्रतिक्रिया भाजपचे आमदार राम कदम यांनी आज दिली. (Ram Kadam Criticizes Maha Vikas Aghadi Government)

दिवाळीच्या पाडव्यापासून म्हणजेच, आजपासून राज्यातील मंदिरं खुली करण्याची परवानगी महाविकास आघाडी सरकारनं दिली आहे. त्यानंतर आज राज्यातील बहुतांश मंदिरं खुली झाली. त्या निमित्तानं भारतीय जनता पक्षानं आज जोरदार जल्लोष केला. भाजपच्या अनेक नेत्यांनी कार्यकर्त्यांसह आपापल्या शहरातील मंदिरांमध्ये जाऊन दर्शन घेतलं. त्या प्रसंगी त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्रही सोडलं.

वाचा: भाजपनं शिवसेनेला मुख्यमंत्रिपदाचा शब्द दिलाच नव्हता; ‘या’ नेत्याचा दावा

भाजपचे आमदार राम कदम हे सपत्नीक वाजत-गाजत, गुलाल उधळत सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी आले होते. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर तोफ डागली. ‘ज्या दिवशी बीअर बार, दारूचे ठेके उघडले, तेव्हाच मंदिरांसाठी नियम तयार करता आले असते. पण हे सरकार बदल्यांमध्ये गुंतलंय. या अहंकारी सरकारला मुद्दामच ते करायचं नव्हतं. जनता रस्त्यावर उतरली. साधूसंत संतप्त झाले. त्यामुळं घाबरून सरकारला मंदिरं उघडावी लागली. हा विजय साधूसंतांचा आहे. ११ कोटी जनतेचा आहे. मंदिरातल्या पुजाऱ्यांचा व मंदिराबाहेर हारफूल विकणाऱ्यांचा आहे,’ असं राम कदम म्हणाले.

विधान परिषद: राज्यपालांकडे नावे पाठवताना ठाकरे सरकारची मोठी खेळी

‘राज्यातील तीन पक्षाच्या सरकारच्या मुस्काटात आज सणसणीत बसली आहे. महाराष्ट्राच्या सरकारची ही प्रचंड मोठी हार आहे. पराभव आहे. परमेश्वराच्या दरबारात चित्रगुप्त नावाची व्यवस्था असते, जी पाप-पुण्याचा हिशेब लिहिते. त्या चित्रगुप्ताच्या दरबारात या सरकारला मोठे शाप मिळणार आहेत. सिद्धिविनायक, साईबाबा, महालक्ष्मी, तुळजाभवानीच्या भक्तांनी या तीन पक्षांना कधीच माफ करू नये,’ असं आवाहनही राम कदम यांनी यावेळी केलं.

वाचा: ‘…म्हणून महाराष्ट्रात परत एकदा फडणवीस सरकार पाहिजे’Source link

You may also like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: