Marathi News

religious places: Live: राज्यात मंदिरांची दारे उघडली; भाविकांमध्ये उत्साह – live updates: religious places open in maharashtra


मुंबईः लॉकडाऊनमुळं आठ महिन्यांपासून बंद असलेली शहरातील सर्व प्रार्थनास्थळे पाडव्याला नागरिकांसाठी खुली करण्यात आली आहेत. दर्शनासाठी भक्तांनीही रांगा लावल्या आहेत. राज्यभरातील मंदिरांनी भक्तांसाठी नियमावली लागू केली आहे. त्यानुसार आज भाविकांना मंदिरात दर्शन घेण्याची मुभा देण्यात येत आहे.

>> नगरचे ग्रामदैवत विशाल गणपती मंदिरात दर्शनासाठी गणेशभक्तांची लगबग

>> नाशिकः श्री काळाराम मंदिर, श्री कपालेश्वर मंदिरासह परिसरातील मंदिरांमध्ये पाडव्याच्या मुहूर्तावर नियम पालन करून भाविकांची उपस्थिती

>> नाशिकः सप्तशृंगगड येथेही भगवतीचे विधिवत पूजन करून मंदिर भाविकांसाठी खुले

>> मुंबईः सिद्धिविनायक मंदिर खुले; सोशल डिस्टनसिंगचे पालन करत भाविकांनी घेतले दर्शन

>> अहमदनगरः तब्बल आठ महिन्यांनी आज भाविकांसाठी शिर्डीचे श्री साई मंदिर उघडले गेले आहे.

>> नागपूरः विदर्भातील आठ शक्तीपीठांपैकी एक असणारे आराध्यदैवत देवी महाकालीचे मंदिर भाविकांसाठी खुले; तूर्त केवळ मुखदर्शनच घेता येणार

महाकाली मंदिरSource link

You may also like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: