मुंबई: पालघरमध्ये दोन साधूंची झालेली हत्या ही अत्यंत दुर्दैवी घटना असून हे प्रकरण महाविकास आघाडी सरकारने गंभीरपणे हाताळत तब्बल २२९ जणांना अटक केली आहे. त्यात १५४ जणांना हत्येच्या आरोपाखाली तर ७५ जणांवर जमावबंदी केल्याप्रकरणी अटक झाली आहे. हे प्रकरण निष्काळजीपणे हाताळणाऱ्या पोलिसांवरही कारवाई करून प्रकरण सीआयडीकडे दिले आहे. आता या प्रकरणाची न्यायालयीन प्रक्रिया सुरू असताना सात महिन्यांनंतर भाजपाकडून हीन दर्जाचे राजकारण केले जात आहे, असा आरोप प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस सचिन सावंत यांनी केला आहे. ( Sachin Sawant Slams BJP over Palghar mob lynching probe )

वाचा: पुढची चार वर्षे कशी जातील हे भाजपला कळणारही नाही; जयंत पाटलांची टोलेबाजी

डहाणू तालुक्यातील ज्या गावात ही दुर्घटना घडली ते गडचिंचले गाव भाजपचा गड म्हणून ओळखाले जात आहे. गेली १० वर्ष तेथे भाजपचा सरपंच आहे. आरोपी क्रमांक ६१ व ६५ यांच्या समवेत अटक करण्यात आलेले बहुसंख्य आरोपी भारतीय जनता पक्षाशी संबंधित आहेत. या प्रकरणातून भाजपाच्या लोकांना वगळता यावे यासाठीच सीबीआय चौकशीची मागणी भाजपाकडून केली जात आहे. यासाठी भाजपाने केलेल्या नौटंकी आंदोलनात ‘राम’ नसून ‘झांसाराम’ आहे असा टोला सावंत यांनी राम कदम यांना लगावला आहे.

वाचा: साईभक्तांसाठी आनंदाची बातमी; शिर्डी संस्थान घेणार मोठा निर्णय

देशभरातील इतर राज्यात झालेल्या साधूसंतांच्या हत्येवर भाजप काहीच बोलत नाही. उत्तर प्रदेशमध्ये साधूंची हत्या झाली, कर्नाटकात तीन-तीन पुजाऱ्यांच्या हत्या झाल्या पण त्यावर भाजप काहीच बोलत नाही. फक्त महाराष्ट्रातील साधूंच्या हत्यांवर भाजप बोलते यातून त्यांचा दांभिकपणा दिसत आहे. साधूंची हत्या, मंदिराच्या प्रश्नावरुन भाजपा हीन राजकारण करत आहे, असेही सावंत म्हणाले.

वाचा: याला म्हणतात स्वत:च्या हातानं तोंडाला काळं फासणं; राम कदमांच्या टीकेला काँग्रेसचे उत्तर

दरम्यान, करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने छठपूजा साजरी करण्याबाबत काही निर्बंध घातले आहेत व नियमावली जारी केली आहे. यावर सरकारने हिंदू विरोधी भूमिका घेतल्याचा कांगावा भाजप नेत्यांनी केला आहे परंतु, असेच निर्बंध गुजरात व हरयाणा या भाजप शासित राज्यांनीही घातले आहेत. हे लक्षात घेता येथे टीका करून भाजपा नेत्यांनी आपल्याच हाताने आपले तोंड काळे करून घेतले आहे, असा हल्लाही सावंत यांनी चढवला.

वाचा: ‘भाजप सरकारच्या काळात महावितरणची थकबाकी ५० हजार कोटी’Source link