Marathi News

Sachin Sawant: याला म्हणतात स्वत:च्या हातानं तोंडाला काळं फासणं; राम कदमांच्या टीकेला काँग्रेसचे उत्तर – sachin sawant attacks on ram kadam over his tweet on chhath puja guideline


मुंबई: करोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी छठपूजा साजरी करण्यावर राज्य सरकारकडून निर्बंध घालण्याचा निर्णय घेतला आहे. समुद्र किनारी, नदी किनारी किंवा तलावाच्या काठी हा उत्सव साजरा करण्यास मनाई करण्यात आली आहे. सरकारच्या या निर्णयावर भाजप नेते राम कदम यांनी केलेल्या टीकेवर काँग्रसे नेते सचिन सावंत यांनी समाचार घेतला आहे.

‘रावणराज चालवणारे मुघलशाही महाविकास आघाडी सरकार हिंदू सणांचा विरोध करणं कधी बंद करणार? अन्य धर्मांच्या सणांना परवानगी देण्यात जशी तप्तरता दाखवता तशीच हिंदू धर्माच्या सणांना का नाही दाखवत? महाविकास आघाडीचे निर्णय इटलीवरुन होतात का?,’ असा बोचरा सवाल राम कदम यांनी केला आहे. राम कदम यांच्या या टीकेला प्रत्युत्तर देताना सचिन सावंत यांनीही सडेतोड उत्तर दिलं आहे.

‘कौतुक आणि टीका दोघांचेही स्वागत, लवकरच नवीन गाणं घेऊन येणार’

‘यालाच म्हणतात स्वत:च्याच हाताने स्वत:च्या तोंडाला काळं फासणं. भाजप नेत्यांना हे देखील माहिती नाही भाजपशासित राज्यांमध्येही छटपुजेचा उत्सव साजरा करण्यावर निर्बंध लादण्यात आले आहेत. तसंच, आरएसएस इटलीमध्येच स्थापन झाली होती, हे तर ऐतिहासिक सत्य आहे.’ असं ट्विट सचिन सावंत यांनी राम कदम यांच्या ट्विटला उत्तर देताना केलं आहे.

‘तुमचा मुलगा आजही आम्हाला संपवायला निघालाय, पण…’Source link

You may also like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: