Marathi News

Sadabhau Khot: Sadabhau Khot: लांडग्याच्या वळचणीला जाणार नाही!; शेट्टींवर खोतांचा ‘हा’ गंभीर आरोप – sadabhau khot attacks raju shetti


सांगली: ‘माझ्या वक्तव्याचा विपर्यास करून मी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या दारात जात असल्याच्या बातम्या रंगविण्यात आल्या. एकेकाळी आमरसासारखा गोड वाटणारा माझा हात आता शेट्टींना कडवट वाटत आहे. अलिबाबा आणि चाळीस चोरांच्या टोळीत जाऊन त्यांचेच हात आता बरबटलेले आहेत, त्यामुळेच मरेपर्यंत आम्ही शेट्टींसोबत जाणार नाही,’ असा पलटवार रयत क्रांती संघटनेचे प्रमुख सदाभाऊ खोत यांनी केला. ते मंगळवारी इस्लामपूरमध्ये प्रसार माध्यमांसोबत बोलत होते. ( Sadabhau Khot attacks Raju Shetti )

वाचा: बाळासाहेबांना आदरांजली वाहण्यासाठी भुजबळ शिवतीर्थावर; फडणवीसांनी केलं ‘हे’ ट्वीट

शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी पुन्हा एकत्र येऊ शकतो, असे वक्तव्य सदाभाऊ खोत यांनी केल्यानंतर खोत आणि राजू शेट्टी हे पुन्हा एकत्र येण्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र, स्वाभिमानी संघटनेतून हाकललेल्या खोतांना पुन्हा सोबत घेणार नाही, असे राजू शेट्टी यांनी स्पष्ट केले. शेट्टींनी झिडकारल्यानंतर खोतांनी त्यावर पलटवार केला. ते म्हणाले, ‘सदाभाऊ खोत यांनी मदतीचा हाथ पसरला आहे, अशा प्रकारच्या वल्गना राजू शेट्टी करत आहेत. त्यांनी प्रस्थापितांची साथ सोडली तरच शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी आम्ही एकत्र काम करू, असे मी बोललो होतो. माझे हात बरबटले आहेत असे म्हणणाऱ्या शेट्टींना यापूर्वी माझे हात आमरसासारखे गोड लागत होते. आता मात्र त्यांना माझे हात कडवट वाटत आहेत. आमचे कार्यकर्ते कधीच लांडग्याच्या वळचणीला जाणार नाहीत.’

वाचा: वीजबिलावर शब्द फिरवला; माजी मंत्र्याने ठाकरे सरकारला दिली ‘ही’ उपमा

राजू शेट्टी यांच्या आमदारकीबद्दल खोत म्हणाले, ‘शेट्टी यांनी स्वतः राष्ट्रवादी काँग्रेसला अनेकदा अलिबाबा आणि चाळीस चोर असे म्हटले आहे. आता आमदारकीच्या तुकड्यासाठी ते अलिबाबा आणि चाळीस चोरांच्या टोळीत सहभागी होत आहेत. शेतकऱ्यांना ज्यांनी गोळ्या घातल्या त्यांच्याकडूनच आमदारकी मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यातूनच कोणाचे हात स्वच्छ आहेत ते समजते. राज्यपालांच्या कोट्यातून आमदारकी मिळवण्यासाठी त्यांची धडपड सुरू आहे. भिकाऱ्यासारखा कटोरा घेऊन ते राष्ट्रवादीच्या दारात उभे आहेत. अशा लोकांच्या सोबतीला आम्ही कधीच जाणार नाही. वैफल्यग्रस्त होऊन खोट्या आरोळ्या ठोकून तुम्हाला सहानुभूती मिळू शकत नाही. ज्यांची चौकशी ईडीने करावी, अशा लोकांच्या पंगतीलाच तुम्ही जाऊन जेवायला बसला. माझ्या विरोधातही तुम्ही ईडी कडे गेला होता. फसवाफसवीचा धंदा बद करा. आम्हाला तुमच्या वळचणीला यायची गरज नाही.’

वाचा: बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी पंकजा नतमस्तक; युतीबाबत केले मोठे विधानSource link

You may also like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: