म. टा. प्रतिनिधी,
सांगली: अल्पवयीन मुलीला लग्नाच्या भूलथापा देऊन तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी दोषी ठरवून अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश डी. एस. हातरोटे यांनी आरोपीला ७ वर्षे सक्तमजुरी आणि १५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. सुखलाल श्रीमंत जाधव (वय ३०, रा.
तासगाव) असे आरोपीचे नाव आहे.
बलात्काराचा गुन्हा १ जानेवारी २०१६ रोजी घडला होता. सरकारी वकील प्रमोद भोकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सुखलाल जाधव याने तासगाव येथील इंदिरानगर झोपडपट्टीत राहणाऱ्या अल्पवयीन मुलीला लग्नाच्या भूलथापा दिल्या. १ जानेवारी २०१६ रोजी तिला पाण्याच्या खणीकडे बोलवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. हा प्रकार पीडित मुलीच्या बहिणीला समजताच, आरोपी जाधव याच्या विरोधात तासगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तासगावचे विभागीय पोलीस उपअधीक्षक के. एम. पिंगळे यांनी गुन्ह्याचा तपास करून न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. न्यायालयात पाच साक्षीदारांच्या साक्षी तपासण्यात आल्या. उपलब्ध पुरावे, साक्षी आणि सरकारी वकिलांचा युक्तीवाद ग्राह्य धरून न्यायाधीश हातरोटे यांनी आरोपीस कलम ३७६ व बाल लैंगिक अत्याचार कायदा कलम ४ नुसार दोषी ठरवले. यानुसार त्याला सात वर्षांची सक्तमजुरी, १५ हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास एका वर्षाची साधी कैद अशी शिक्षा सुनावली.
धक्कादायक! तरुणीनं एक्स बॉयफ्रेंडला भेटायला बोलावलं; अॅसिड फेकले
पुणे: IT इंजिनीअरने बायोडाटा केला अपलोड; गमावले २० लाख रुपये
CCTV: नागपुरात मध्यरात्री कार पेटवली, ८ वाहनांची केली तोडफोड
रात्री दुकान बंद करून मालक घरी निघाला, इतक्यात तिघे दुचाकीवर आले अन्
Source link
Like this:
Like Loading...
Related