वाचा: प्रताप सरनाईक यांच्या घरावर छापे; भुजबळांना ‘ही’ शंका
‘बाळासाहेब ठाकरे संपूर्ण आयुष्यभर काँग्रेसवाल्यांना भ्रष्टाचारी म्हणत होते. मात्र, त्यांच्या स्वत:च्या पक्षातील लोकांनी किती मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार केला आहे हे बाळासाहेबांना कळू शकले नाही. महापालिका हा भ्रष्टाचाराचा एक अड्डा आहे हे त्यांनी समजले नाही. या भ्रष्टाचारातून आलेली कमाई शिवसेनेच्या लोकांच्या खिषात व घरात जाते. त्यामुळं ह्या सगळ्याची चौकशी व्हायलाच हवी. त्या चौकशीमागे राजकीय द्वेष नसेल तर त्याला हरकत घेण्याची अजिबात गरज नाही,’ असं निरुपम यांनी म्हटलं आहे.
संजय निरुपम हे एकेकाळी शिवसेनेत होते. शिवसेनेतून हकालपट्टी झाल्यानंतर ते काँग्रेसमध्ये गेले. काँग्रेसच्या तिकिटावर ते खासदार म्हणूनही निवडून आले होते. मुंबई काँग्रेसचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवले होते. मात्र, काँग्रेसमधील गटातटाच्या राजकारणाशी त्यांना जुळवून घेता न आल्यानं ते सध्या बाजूला फेकले गेले आहेत. शिवसेनेसोबत जाण्याच्या काँग्रेसच्या निर्णयाला त्यांचा विरोध होता. त्यातूनच ते आता महाविकास आघाडीच्या विरोधात, विशेषत: शिवसेनेच्या विरोधात सातत्यानं बोलत असतात. सरनाईक यांच्या निमित्तानं त्यांनी पुन्हा एकदा ती संधी साधली आहे.
वाचा: सरनाईक हे कोणी साधूसंत नाहीत; ‘या’ नेत्याचा जोरदार टोला