मुंबई: मुंबईतील कराची बेकरीच्या नावाला शिवसेनेचे नितीन नांदगावकर यांनी आक्षेप घेतला आहे. वांद्रे येथील कराची बेकरीचं नाव बदला, अशी मागणी नांदगावकर यांनी केली आहे. त्यामुळं शिवसेनेनं केलेल्या या मागणीवर अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती. तसंच, सोशल मीडियावरही शिवसेनेवर टीका होत होती. या सगळ्या प्रकरणावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

कराची बेकरीचे नाव बदला किंवा त्यातील कराची हा शब्द काढून टाका, असं नितीन नांदगावकर यांनी म्हटलं आहे. मुंबई आणि महाराष्ट्रात कराची नावाने कोणतेही व्यवसाय चालाणार नाहीत. महाराष्ट्रात राहायचं असेल, तर असं नाव चालणार नाही, असा इशारा नितीन नांदगावकर यांनी दिला होता. यावर, संजय राऊत यांनी ही शिवसेनेची अधिकृत भूमिका नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

शिवसेनेच्या मूर्ख कार्यकर्त्यांला सत्य कधी कळणार?; काँग्रेस नेत्याचा टोला

संजय राऊत यांनी ट्वीट करत पक्षाची भूमिका मांडली आहे. ‘कराची बेकरी आणि कराची स्वीट्स ६० वर्षांपासून मुंबईसह देशात आहेत. त्यांचा पाकिस्तानशी संबध नाही. निर्वासित सिंधी पंजाबी बांधवांनी कष्टातून उभा केलेला हा व्यवसाय आहे. कराची बेकरीचे नाव बदला ही मागणी निरर्थक आहे. ही शिवसेनेची अधिकृत भूमिका नाही,’ असं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, काँग्रेस नेते संजय निरुपम यांनीही शिवसेनेचे नितीन नांदगावकर यांचे कान टोचले आहेत. ‘भारतातील चायनीज हॉटेलांचा जसं चीनसोबत काही संबंध नाही तसाच, वांद्रे येथील कराची स्वीट्सचा पाकिस्तानशी कोणताही संबंध नाही. हे सत्य शिवसेनेचे मुर्ख कार्यकर्ता कधी समजणार? ७० वर्षांच्या दुकानाचं नाव बदलण्याची जी धमकी दिली आहे ते चुकीचं आहे. मुख्यमंत्र्यांनी या दुकानाला संरक्षण द्यावे,’ असं ट्वीट संजय निरपम यांनी केलं आहे.

पाहा व्हिडिओ : कराची स्वीट्स दुकानाचे नाव बदलण्याची नितीन नांदगावकरांची मागणी

कराची स्वीट्स दुकानाचे नाव बदलण्याची नितीन नांदगावकरांची मागणीSource link