सातारा: साताऱ्यातील कराड तालुक्यातील सैदापूर येथे एकाच कुटुंबातील तीन सख्ख्या बहिणींचा आकस्मिक मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण सातारा जिल्हा हादरला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी अत्यंत गोपनीयता बाळगून गुरूवारी रात्रीपासून तपास सुरू केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री कुटुंबासमवेत एकत्रित जेवण झाल्यानंतर संबंधित तीन मुलींसह आईला उलट्या व जुलाबाचा त्रास सुरू झाला. त्यांना तात्काळ कृष्णा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान तीन मुलींचा मृत्यू झाला. अन्नातून विषबाधा झाली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वरोटे या घटनेचा तपास करत आहेत.
वर्ध्यातील सशस्त्र दरोड्याचा २४ तासांत छडा; धक्कादायक माहिती झाली उघड
२४ वर्षांची तरुणी रस्त्याने जात होती, त्याने बराच वेळ पाठलाग केला अन्…
धक्कादायक! गर्भवती तरुणीने लग्नासाठी लावला तगादा; बॉयफ्रेंडने फेकले अॅसिड