मनोरंजन

Sharad Pawar: We Have Never Had A Governor Like This In Maharashtra, Says Ncp Chief Sharad Pawar – Mumbai Farmer Protest: असे राज्यपाल महाराष्ट्राने पाहिले नाहीत; पवारांचा घणाघात | Maharashtra Times

[ad_1]

मुंबई: ‘कंगना राणावत हिला भेटण्यासाठी आपल्या राज्यपालांकडे वेळ आहे, पण आमच्या शेतकऱ्यांसाठी वेळ नाही. असे राज्यपाल महाराष्ट्रानं कधीही पाहिले नाहीत,’ अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर तोफ डागली. (Sharad Pawar slams Governor Bhagat Singh Koshyari)

वाचा: त्यांची नावं उघड करू का?; ‘त्या’ प्रश्नावर अजित पवार भडकले

नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात गेल्या दोन महिन्यांपासून दिल्लीत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना पाठिंबा म्हणून व अन्य काही मागण्यांसाठी राज्यातील शेतकरी संघटनांनी आज मुंबईतील आझाद मैदानावर संयुक्त मोर्चा काढला आहे. अनेक संघटना यात सहभागी झाल्या असून महाविकास आघाडीतील पक्षांनी या मोर्चाला पाठिंबा दिला आहे. शेतकऱ्यांना पाठिंबा म्हणून शरद पवार हे स्वत: आंदोलनस्थळी गेले होते. तिथं त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. ‘देशाच्या स्वातंत्र्यसंग्रामात मुंबईनं आक्रमकपणाची भूमिका घेतली. संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीसाठी मुंबईतील कष्टकरीवर्ग रस्त्यावर उतरला, या वेळेस महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी लोक मुंबईला आले आहेत, असं म्हणत, पवार यांनी सर्व मोर्चेकऱ्यांचे आभार मानले.

कंगनाला भेटायला राज्यपालांना वेळ पण शेतकऱ्यांना भेटायला वेळ नाही- शरद पवार

मोर्चानंतर शेतकऱ्यांचं एक शिष्टमंडळ राज्यपालांना भेटायला जाणार आहे. त्यांना निवेदन देणार आहे. हे माहीत असूनही राज्यपाल गोव्याला गेले. त्यावरून शरद पवारांनी राज्यपालांवर टीकास्त्र सोडलं. ‘महाराष्ट्राच्या इतिहासात असा राज्यपाल झाला नाही. त्यांना कंगना राणावतला भेटायला वेळ आहे, पण शेतकऱ्यांसाठी वेळ नाही. शेतकऱ्यांचं शिष्टमंडळ केवळ त्यांना निवेदन देणार होतं. राज्यपालांनी त्यांना भेटणं गरजेचं होतं. ही त्यांची जबाबदारी होती,’ असं पवार म्हणाले.
केंद्रावरही निशाणा

दिल्लीत आंदोलन करणाऱ्या शेतकरी आंदोलकांना सत्ताधारी भाजपकडून ‘खलिस्तानी’ संबोधण्यात आलं होतं. त्यांच्यावर अनेक आरोप करण्यात आले होते. या सगळ्याचा पवार यांनी समाचार घेतला. ‘दिल्लीत फक्त पंजाबचे शेतकरी आंदोलन करत आहे, असं भाजपचं म्हणणं आहे. पण ते पाकिस्तानी आहेत का? किंवा ते कोणी ऐरेगैरे आहेत का? त्यांनीच आजवर देशाचं संरक्षण केलं आहे,’ असं पवार म्हणाले.

वाचा: मोदी सरकार अर्णव गोस्वामीला का वाचवतंय?; ‘या’ नेत्याचा सवाल

[ad_2]

Source link

Follow me!

You may also like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

PAGE TOP
%d bloggers like this: