घटस्फोटीत महिलेशी लग्न करायचे ठरले
नांदेड येथील मुखेड तालुक्यातील बिल्लाई गावात संदीप राहतात. रमाई आनंद कांबळे या तरुणीचा तीन वर्षापूर्वी घटस्फोट झालेला. अडचणी अनेक होत्या. या अडचणींबाबत शीतल आमटेंशी बोलणं व्हायचं. ‘संदीप तू तिच्यासोबत बिनदास लग्न कर आणि माझ्याकडे ये. मी यथोचित स्वागत करून दोघांनाही जोड आहेर करते व तुला आयुष्यात कधीच मोठ्या बहिणीची कमी जाणवू देणार नाही” असा शब्द शीतल आमटे यांनी दिलेला.
संदीप कांबळे सांगतात, साखरपुड्याच्या दिवशी ताईचे हे शब्द कानात गुंजत होते. तिच्यासोबत लग्न करण्याचा विचार त्यांनी शीतल आमटेंना बोलून दाखवला होता. त्यांनी या लग्नाला प्रेरणा देऊन संपूर्ण पाठिंबा दिला. ७ फेब्रुवारी रोजी हे जोडपं लग्न करणार आहे. तीन वर्षापूर्वी घटस्फोट झालेला. धुळ्याची मुलगी. दिलेल्या घरी जादूटोण करतात असं सांगत होते. शीतल आमटेंच्या संपर्कात आलोय. स्त्रीयांसाठी काम करू असं सांगत होते. नियोजन झालं होतं. महिलांमना एकत्र घेऊन काम करू. समाजामध्ये कृतिशील काम करायचे आहे. घटस्फोट, वारांगणा, विधवांंसाठी काम करणार होतो. होकार ही दिला होता. स्वत:पासून काम करत होतो. त्यांच्याशी लग्न कर म्हणून सांगायच्या त्या मला.
क्लिक करा आणि वाचा- ‘परळ ब्रँड’ शिवसैनिक गेला! मोहन रावले यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन
संदीप कांबळे म्हणतात खूप रडलो.
संदीप कांबळे म्हणाले, ‘ते सगळं वेदनादायक होतं. मी खूप रडलो. ट्विट केलेलं होते. त्याच मुलीशी आता माझा साखरपुडा झाला आहे. आम्ही तिच्याशी चर्चा करून लग्नाची तारीख काढणार होतो. काल ताई असायला हव्या होत्या. आम्ही ७ फेब्रुवारी रोजी लग्न करणार आहोत. त्याच दिवशी लग्न करेन. त्यांच्या साक्षीने आमचं झालं असतं असतं तर फार बरं वाटलं असतं. मोठ्या बहिणीसारखी उभी राहीन, हे त्यांचे शब्द सतत आठवत आहेत. लग्नाला उपस्थित राहीन म्हणाल्या होत्या. छोट्या भावासारखी वागणूक देत होत्या.’
क्लिक करा आणि वाचा- काँग्रेसची आज महत्वाची बैठक; हा नेत्याने सोनियांना म्हटले, ‘पुत्र की लोकशाही?’
क्लिक करा आणि वाचा- करोनाची लस ऐच्छिक; केंद्राकडून लसीकरणाबाबक सूचना जाहीर