Marathi News

Shirdi Sai Sansthan To Hold Blood Donation Camp – रक्ताची टंचाई! शिर्डीच्या साई संस्थानने घेतला ‘हा’ निर्णय


अहमदनगर:करोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता गरजू रुग्‍णांसाठी रक्‍तांची निकड भासत आहे. तर, दुसरीकडे अनलॉकमुळे हळूहळू जनजीवन पूर्वपदावर येत आहे. त्‍यामुळे रुग्णालयात येणाऱ्यांची संख्या वाढू लागली असून दैनंदिन रुग्‍णांकरीता अथवा प्‍लॅन शस्‍त्रक्रिया तसेच तातडीचे शस्‍त्रक्रिया करीता रक्‍ताची टंचाई भासत चालेली आहे. ही टंचाई काही प्रमाणात दूर व्हावी, यासाठी शिर्डीच्या श्री साईबाबा संस्‍थानच्या वतीने २४ नोव्‍हेंबर रोजी साईआश्रम-एक निवासस्‍थान येथील शताब्‍दी मंडपामध्‍ये रक्‍तदान शिबीर घेण्यात येणार आहे.

करोना: दिल्लीचा दाखला देत बीएमसी आयुक्तांचं मुंबईकरांना ‘हे’ आवाहन

जगभरात थैमान घातलेल्‍या करोना विषाणुच्‍या संकटामुळे प्रतिबंधात्‍मक उपाययोजना म्‍हणून सरकारने लॉकडाऊन केले होते. सध्‍या लॉकडाऊन हळूहळू हटविण्‍यात येत असून जनजीवन पूर्वपदावर येत आहे. दुसरीकडे दैनंदिन रुग्‍णांकरीता अथवा प्‍लॅन शस्‍त्रक्रिया, तातडीचे शस्‍त्रक्रिया करीता रक्‍ताची टंचाई भासत चालेली आहे. ही टंचाई दूर करण्यासाठी शिर्डी संस्थांनने पुढाकार घेतलाय.

वाचा: वर्ष उलटल्यानंतरही भाजप नेते आशेवर; विखे-पाटील म्हणतात…

श्री साईबाबा संस्‍थानची श्री साईनाथ रक्‍तपेढी ही महाराष्‍ट्रातील नामांकीत रक्‍तपेढी असून नगर जिल्‍ह्यातील जवळजवळ निम्‍याहून अधिक रक्‍तपुरवठा या रक्‍तपेढीमार्फत करण्‍यात येतो. सध्‍याच्‍या स्थितीला श्री साईनाथ रक्‍तपेढीमध्‍ये पुरेसा रक्‍तसाठा उपलब्‍ध नाही. तसेच करोना विषाणुचा प्रादुर्भाव लक्षात घेता गरजू रुग्‍णांसाठी रक्‍तांची निकड लक्षात घेऊन श्री साईबाबा संस्‍थानच्‍या वतीने येत्या मंगळवारी (२४ नोव्हेंबर) सकाळी ९ ते सायंकाळी ५ यावेळेत रक्‍तदान शिबीराचे आयोजन करण्‍यात आलेले आहे. या रक्‍तदान शिबीरामुळे रक्‍ताची टंचाई काही प्रमाणात कमी होणेस नक्‍कीच मदत होईल. त्यामुळे जास्‍तीत जास्‍त इच्‍छुक शिर्डी ग्रामस्‍थ, साईभक्‍त व संस्‍थान कर्मचारी यांनी या रक्‍तदान शिबीरात आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन करण्यात आले आहे.

करोनाची दुसरी लाट येण्याची दिल्लीत चिन्हे दिसू लागली आहेत. यासर्व पार्श्वभूमीवर जास्तीतजास्त लोकांनी रक्तदान करावे. येणारे भक्त देखील यामध्ये सहभागी होऊ शकतील. लोकांच्या सेवेसाठी हा उपक्रम आपण करीत आहोत.

कान्‍हूराज बगाटे , सीईओ, शिर्डी संस्थान

वाचा: घर देत नाही म्हणून आईचे डोके भिंतीवर आपटले!Source link

You may also like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *