[ad_1]
नाशिक: सिन्नर तालुक्यातील वावी गावात जबरी चोरीची घटना उघडकीस आली आहे. चोरट्यांनी बीअर बार फोडून त्यातील दारूच्या ३० बॉक्ससह सव्वा दोन लाखांचा ऐवज लंपास केला. ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
दोन ते तीन जण सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहेत. त्यांनी दरवाजा तोडून आतमध्ये प्रवेश केला. विदेशी दारूच्या बाटल्या असलेले २५ ते ३० बॉक्स लंपास केले. दोन लाख ३८ हजार रुपयांचा मुद्देमाल आणि १४ हजार रुपये किंमतीच्या दोन सायकलीही पळवल्या. ही घटना उघडकीस येताच, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला. सिन्नर पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.
[ad_2]
Source link