son beating mother for property: घर देत नाही म्हणून आईचे डोके भिंतीवर आपटले; मुलगा व सुनेविरुद्ध गुन्हा – fire booked against son with 3 person in wakad police station over son beating mother for property


म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

‘राहत्या ठिकाणची जागा आणि बांधलेल्या खोल्या आम्हाला दे,’ असे म्हणून मुलगा, सून आणि सुनेच्या आई-वडिलांनी मिळून वृद्धेला मारहाण केली. ही घटना मंगळवारी (१७ नोव्हेंबर) रात्री साडेदहा वाजता पडवळनगर, थेरगाव येथे घडली.

सीताबाई महादेव वाघमारे (वय ६५, रा. पडवळनगर, थेरगाव) असे जखमी महिलेचे नाव आहे. त्यांनी याबाबत बुधवारी (१८ नोव्हेंबर) वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मुलगा अशोक महादेव वाघमारे (वय ४०), सून प्रीती अशोक वाघमारे (३५, रा. पडवळनगर, थेरगाव) आणि प्रीतीचे आई-वडील यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सीताबाई यांची पडवळनगर, थेरगाव येथे गणेश मंदिरासमोर जागा आहे. त्या जागेवर त्यांनी काही खोल्या बांधल्या आहेत. ‘राहती जागा आणि बांधलेल्या खोल्या आम्हाला दे. आम्ही तुला मरेपर्यंत सांभाळू,’ अशी आरोपींनी सीताबाई यांच्याकडे मागणी केली. मात्र, त्यास सीताबाई यांनी नकार दिला. यावरून आरोपी मुलगा आणि सुनेने त्यांना केसाला पकडून भिंतीवर डोके आपटून गंभीर जखमी केले. तर, प्रीतीच्या आई- वडिलांनी सीताबाई यांना शिवीगाळ करून हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जखमी केले. या प्रकरणी वाकड पोलिस तपास करीत आहेत.Source link

Leave a Reply