Marathi News

talaq over phone: पती फोनवरच म्हणाला ‘तलाक’, पत्नीने दिली पोलिसात तक्रार अन्…. – woman given instant talaq over phone by husband in nagar


म.टा.प्रतिनिधी, नगर: दुबई वरून परत आलेल्या पत्नीला फोनवरच ‘मैने तुझे तलाक दे दिया है’, असे म्हणणाऱ्या पतीवर नगरच्या भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात ‘मुस्लिम महिला विवाह अधिकाराचे संरक्षण अधिनियम २०१९’ चे कलम ३ व ४ प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत पीडित पत्नीने पोलिसात तक्रार दिली होती.

नगरला राहणाऱ्या एका महिलेचे लग्न मुळचा जम्मू-काश्मीर येथील असणाऱ्या व सध्या मुंबई येथे राहणाऱ्या एका व्यक्तीसोबत झाले होते. ही महिला दुबई येथे नोकरीच्या निमित्ताने गेली होती. त्यानंतर ती दुबईवरून नुकतीच परत आली, व या महिलेने तिच्या पतीला काल, शुक्रवारी फोन केला. त्यावेळी तिचा पती फोनवर बोलताना म्हणाला, ‘तु इंडिया मे आ गयी क्या. इंडिया क्यू आइ. मेरा तेरे से और बेटी से कुछ रिश्ता नही. मुझे तेरे साथ संबंध नही रखने. मैने तुझे तलाक दे दिया आहे,’ असे म्हणून त्याने फोन ठेवून दिला.

वाचाः … तोपर्यंत राज्यात ‘ऑपरेशन कमळ’ अशक्य, या मंत्र्यानं दिलं आव्हान

फोनवर ‘तलाक हा शब्द वापरल्यामुळे संबंधीत महिलेने आपल्या पतीच्या विरोधात भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. या तक्रारीवरून तिच्या पतीवर मुस्लिम महिला विवाह अधिकाराचे संरक्षण अधिनियम २०१९ चे कलम ३ व ४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाचाः पुण्यात खळबळ; मनसे नेत्या रुपाली पाटील यांना जीवे मारण्याची धमकी

वाचाः बनावट डिझेल प्रकरणाचा सूत्रधार कोण?; ‘या’ मंत्र्यांनी दिलं स्पष्टीकरणSource link

You may also like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: