Marathi News

Thane: ठाणे: पत्नीसोबत भांडण झाले, पतीने जिवंत पेटवून दिले – thane man kills wife in kalwa


म. टा. प्रतिनिधी, ठाणे : पतीने पत्नीची अत्यंत क्रूरपणे हत्या केल्याची खळबळजनक घटना कळवा पूर्व भागात घडली. या प्रकरणी कळवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी आकाश कटुवा (२४) याला अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

आकाश आणि त्याची पत्नी लक्ष्मी कळवा रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या मफतलाल कॉलनी येथील चाळीत राहत असून त्यांच्यात काही कारणावरून वारंवर भांडणे होत असत. गुरुवारी पुन्हा कडाक्याचे भांडण झाल्यानंतर सायंकाळी आकाशने पत्नीवर चाकूने हल्ला केला. नंतर ज्वलनशील पदार्थांचा वापर करून घरातच जाळत तिची हत्या केली. त्यानंतर आकाशने पोलिस नियंत्रण कक्षाला फोन करून पत्नीला जाळल्याची माहिती दिली. या माहितीनंतर कळवा पोलिसांनी तात्काळ आकाशच्या घरी धाव घेतली. हा प्रकार घडला त्यावेळी आरोपीचे आईवडील बाहेर गेले होते, अशी माहिती एका पोलिस अधिकाऱ्याने दिली.

दोन वर्षांनी अटक

कल्याण: व्हॉट्सअॅप मेसेजवरून झालेल्या भांडणातून एका व्यक्तीची धारदार शस्त्राने वार करून निर्घृण हत्या केल्याची घटना दोन वर्षांपूर्वी डोंबिवली पूर्वेकडील जुन्या डोंबिवली परिसराजवळ घडली होती. पोलिसांनी याप्रकरणी ९ जणांना अटक केली होती. तर उर्वरित तीन आरोपी फरार होते. या फरार आरोपींपैकी दोघांना बुधवारी पोलिसांनी अटक केली आहे. विशाल सुरेश गायकवाड (२४), अरविंद कामता प्रसाद (२१) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे असून सोनू गुप्ता फरार आहे.

रेल्वे स्टेशनवर २.२९ कोटींची रोकड, एक कोटींचे दागिने हस्तगत

टिश्यू पेपरवरून वाद; ढाब्यावर तरुणाची हत्या

प्रेम, फसवणूक, मुंडके छाटले, मृतदेहाची विल्हेवाट; व्यापाऱ्याची क्रूर हत्याSource link

You may also like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: