Marathi News

Vicco Vajradanti: ‘विको वज्रदंती’च्या दर्जावर एफडीएसह नामवंत संस्थांचे शिक्कामोर्तब – vicco vajradanti powder achieves new milestone


मुंबई: ‘मसुडों मे जान तो दातों की शान’ या घोषवाक्यासह सर्वसामान्यांच्या घराघरात पोहोचलेल्या विकोच्या वज्रदंती पावडरच्या दर्जावर एफडीएसह अनेक नामवंत संस्थांनी शिक्कामोर्तब केले आहे. ‘विको लेबोरेटरीज‘चे संचालक संजीव पेढारकर यांनी ही माहिती दिली आहे.

एक, दोन नव्हे तब्बल १८ आयुर्वेदिक औषधींचा समावेश असलेली वज्रदंती आज घराघरात वापरली जाते. ‘बाभूळ, जांभूळ, लवंग, मंजिष्ठा, दालचिनी, वज्रदंती, अक्रोड, बोर, खैर, बकुळ, ज्येष्ठमध, अनंतमूळ, त्रिफळा, अक्कलकाढा, ओवा, पतंग, साखर आणि मीठ याचा वज्रदंती पावडरमध्ये समावेश असतो. वज्रदंती पावडरचे कुठलेही साइड इफेक्ट्स होत नाहीत हे याचे वैशिष्ट्य आहे. त्यामुळेच या पावडरला लोकांची मोठ्या प्रमाणावर पसंती मिळते, असं पेंढाकर यांनी सांगितलं.

‘बीबीसी नॉलेज’ या संस्थेनं विको लेबोरेटरीजची उत्पादने नुकतीच प्रमाणित केली आहेत. सर्वोच्च न्यायालयानंही विको वज्रदंती पेस्ट, पावडर व विकोच्या अन्य आयुर्वेदिक उत्पादनांच्या गुणवत्तेवर शिक्कामोर्तब केले आहे,’ याकडेही पेंढारकर यांनी लक्ष वेधलं आहे.Source link

You may also like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: