Marathi News

vijay wadettiwar: शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारला तीन पत्र लिहली, पण…; वडेट्टीवारांचा केंद्रावर निशाणा – vijay wadettiwar attacks on central government over farmer help


मुंबई: ‘राज्यावर सगळ्यात मोठं संकट असताना केंद्राकडून मात्र सरकारसोबत दुजाभाव होत असल्याचा,’ आरोप, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. नागपुरात प्रसार माध्यमांशी संवाद साधत असताना ते बोलत होते.

‘महाविकास आघाडी सरकार हे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे आहे. आत्तापर्यंत २२९७ कोटींची मदत दिवाळीच्या आधी दिली आहे. पुढच्या आठवड्यात शेतकरी मदतीचा दुसरा टप्पा दिला जाणार आहे. १० डिसेंबरपर्यंत पूर्ण निधी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेल,’ असा विश्वास वडेट्टीवार यांनी व्यक्त केला आहे. त्याचबरोबर त्यांनी शेतकऱ्यांच्या मदतीवरुन केंद्रावर निशाणा साधला आहे.

वरवरा राव यांच्यावर नानावटी रुग्णालयांत होणार उपचार

‘शेतकऱ्यांच्या मदतीसाठी केंद्र सरकारला तीन पत्र लिहली, पाहण पथक पाठवण्यासाठी मागणीही करण्यात आली. तरीही केंद्राकडे प्रस्ताव आलाच नाही, असं भाजपचं म्हणणं आहे. त्यामुळं आम्ही आणखी एक पत्र पाठवणार आहोत, अशी माहिती वडेट्टीवार यांनी दिली आहे. तसंच, किसान सन्मान योजनेत ६०० कोटींची मदत केंद्र करते तरीपण अनेक शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचली नाही. केंद्र सरकार शेतकऱ्यांचा अपमान करत आहे,’ असंही वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.

देशद्रोहाचा गुन्हा; मुंबई पोलिसांकडून कंगनाला तिसऱ्यांदा समन्स

याला म्हणतात स्वत:च्या हातानं तोंडाला काळं फासणं; राम कदमांच्या टीकेला काँग्रेसचे उत्तरSource link

You may also like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: